रत्नागिरी : कोरोना पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज दि. ४ मेपासून सुरू होत आहे. त्यातील नव्या सवलतीनुसार जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या या आणि जिल्ह्याबाहेर जाऊ इच्छिणाऱ्यांना अर्जाद्वारे परवानगी दिली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आज सकाळी ११ वाजता फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यात https://www.facebook.com/ratnagiricollector या लिंकद्वारे सहभागी होता येईल. या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य़कारी अधिकारी कान्हुराज बगाटे सहभागी होणार आहेत. दरम्यान, कोरोना लॉकडाऊनच्या निकषांनुसार जिल्ह्याचे वर्गीकरण ऑरेंज झोनमध्ये करण्यात आले आहे. त्यानुसार सवलती दिल्या जाणार आहेत. त्याविषयीची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमादरम्यान दिली जाणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:26 AM 04-May-20
