➡️ रेड झोन वरून येण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आ. प्रसाद लाड यांचा तोल सुटला
रत्नागिरी : मुंबई सारख्या रेड झोन मधून तुम्ही रत्नागिरीत येता यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका अधिक वाढतो, सामान्यांना जो नियम तो राजकारण्यांना लागू नाही काय ? या प्रश्नाला उत्तर देताना असे असल्यास आमच्याकडून मदत पण घेऊ नका असे धक्कादायक विधान आज आ. प्रसाद लाड यांनी केले. मात्र पत्रकारांनी याबाबत जाब विचारताच त्यांनी सारवासारव केली. आपणाकडे कोकणातील लोकांनी मदत मागितली होती काय ? या प्रश्नाला देखील त्यांनी उत्तर दिले नाही.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:55 PM 04-May-20
