रत्नागिरी : राज्य शासनाच्या सूचनांनुसार रत्नागिरीत सोमवारपासून लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली. पूर्व परवानगीने दारूची दुकाने उघडली जाणार आहेत. मात्र ही दुकाने उघडण्यापूर्वीच तळीरामानी सोमवारी दारू दुकांनाबाहेर रांग लावली. दीड महिना चातकासारखी वाट पाहिलेल्या तळीरामांनी सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून दारु दुकानांबाहेर हजेरी लावली. यावेळी 3 फुटाचे अंतर सोडून नियमांचे पालन केल्याचे दिसून आले.
