”ऑरेंज झोनमधून रेडझोनमध्ये जाण्यास वेळ लागणार नाही; नागरिकांनी शिथिलतेचा गैरफायदा घेऊ नये”

रत्नागिरी : जिल्ह्यात विविध कारणांमुळे अडकलेल्या लोकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी व जिल्हा बाहेरील लोकांना जिल्ह्यात येण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे उपस्थित होते. यावेळी दिलेल्या नियमांचे संयमाने पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. ‘शिथिलतेचा अतिरेक किंवा गैरफायदा नागरिकांनी घेऊ नये. शिथिलतेमुळे काही अडचणी निर्माण झाल्यास ही शिथिलता बंद होऊ शकते. सोशल डिस्टन्सिंगचे किमान बंधन प्रत्येकाने पाळले पाहिजे. ऑरेंज झोनमधून रेडझोनमध्ये जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, कोरोनाविरूद्धचा लढा एकजुटीने लढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे यांनी केले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here