हर्णेच्या कड्यावरून पडून युवक जखमी

0

दापोली : हर्णे येथील कनक दुर्ग किल्ल्यावरील लाईट हाऊस येथे किमान ६० फुटांच्या कड्यावरून (कनकदुर्ग किल्ला) पडून एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर दापोलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दापोली तालुक्यातील कुंभवे गावचा शिवम राजेंद्र किरडावकर (२०) हा फिरण्यासाठी म्हणून एकटाच हर्णे लाईट हाऊसवर (कनकदुर्ग किल्ला) आला होता. त्या ठिकाणी त्याला कोणाचा तरी फोन आला. फोनवर बोलण्याच्या नादात किल्ल्याच्या एकदम कडेला गेला आणि तेथून पाय घसरून खाली असलेल्या समुद्री कातळावर पडला. किमान ६० फूट उंचीच्या या कड्यावरून खाली कोसळल्याने त्याला गंभीर दुखापत होवून तो जागेवरच बेशुद्ध झाला होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 21/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here