बाजार समितीतील आंबा विक्रीला अल्प प्रतिसाद

रत्नागिरी : कोरोनामुळे संकटात सापडलेल्या हापूस आंब्याच्या बागायतदारांना मदत करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला. समितीच्या आवारात आंबा खरेदी-विक्री सुरू करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. आठ दिवसात अवघ्या अडीच लाख रुपयांचा हापूस तेथे विकला गेला. डझनला पावणेतीनशे ते साडेचारशे रुपये दर मिळाला. गेली दोन वर्षे बाजार समिती आवारात उभारलेल्या लाखो रुपयांच्या आंबा खरेदी-विक्री केंद्राला कोरोनातील लॉकडाऊनमुळे मुहूर्त मिळाला. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी पुढाकार घेतला होता. आंबा ने-आण करण्यासाठी बागायतदारांची होत असलेली पंचाईत लक्षात घेऊन ही व्यवस्था सुरु केली गेली. 23 एप्रिलला याचा आरंभ झाला.  गेल्या आठ दिवसात बाजार समितीत किरकोळ आंब्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु झाले. त्यामध्ये  2 मे रोजी सुमारे 120 डझन आंब्याची विक्री झाली असून सुमारे साठ हजार रुपयांची उलाढाल झाली. 29 एप्रिलला 253 डझनची विक्री झाली, त्यातून 81 हजार 900 रुपये मिळाले. त्यादिवशी पेटी 2100 रुपये दर मिळाला. 28 ला 247 डझन आंब्यांच्या विक्रीतून 1 लाख 8 हजार रुपये मिळाले. या दिवशी साडेचारशे रुपये डझन इतका दर आंब्याला मिळाला होता. 27 एप्रिलला 10 हजार 950 रुपयांची विक्री झाली असून 30 डझन आंबे उपलब्ध होते. यामध्ये आंब्याचा दर डझनला पावणेतीनशेपासून साडेचारशे रुपयांपर्यंत होता.  तर मे महिना हंगाम असल्यामुळे नियमित विक्री सुरु राहणार असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here