भूकंपाच्या धक्क्याने इंडोनेशिया हादरलं; 46 जणांचा मृत्यू, 700 हून अधिक जखमी

0

इंडोनेशियाला भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे.

जावा बेटावर सोमवारी झालेल्या भूकंपात तब्बल 46 जणांचा मृत्य़ू झाला असून 700 जण जखमी झाले आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, 5.4-रिश्टर स्केलचा हा भूकंप पश्चिम जावा प्रांतातील सियांजूर भागात झाला. सियांजूर जिल्ह्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी घरांसह अनेक इमारतींचं मोठं नुकसान झाल्य़ाचं म्हटलं आहे.

दक्षिण जकार्ता येथील कर्मचारी विदी प्रिमधनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “भूकंपाचे धक्के खूप तीव्र जाणवले. माझ्या सहकाऱ्यांनी आणि मी नवव्या मजल्यावरील आपत्कालीन पायऱ्यांवरून कार्यालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.” सियांजूर प्रशासनाचे प्रमुख हरमन सुहरमन म्हणाले, “मला आता मिळालेल्या माहितीवरून, एका रुग्णालयात सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कमीतकमी 300 लोकांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here