हॉलमधील पर्स लांबल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Young woman buying handbag, San Lorenzo market, Florence, Tuscany, Italy

रत्नागिरी : ब्लॉकचा मुख्य दरवाजा उघडून हॉलच्या टेबलवरील पर्स लांबल्याची घटना शनिवार 2 मे रोजी दुपारी 12 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयासमोरील यश अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्समधून रोख 1 हजार रुपये आणि काही कागदपत्रे चोरीस गेली आहेत. याप्रकरणी रत्नमाला रामदास लाटे (65, रा.यश अपार्टमेंट, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी दुपारी त्यांच्या ब्लॉकच्या मुख्य दरवाजा कडी न लावला बंद करण्यात आला होता. या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने त्यांच्या ब्लॉकमध्ये शिरुन टेबलवरील पर्स लांबवली. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here