‘जनशताब्दी एक्स्प्रेस’च्या इंजिनला खेडमध्ये बिघाड

0

खेड : मडगावहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसचे (१२०५२) इंजिन खेड रेल्वे स्थानकाजवळ बंद पडले.

रविवारी दि. २० रोजी रात्री ८.४८ वाजल्यापासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत खेड स्थानकात रखडली. यावेळी कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. रात्री दहा वाजता रत्नागिरी येथून दुसरे इंजिन आल्यानंतर जनशताब्दी एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. या घटनेमुळे प्रवासी मात्र एक ते दीड तासापर्यंत ट्रेनमध्येच रखडून राहिले होते.

दिव्याहून रत्नागिरीला येणारी दिवा – रत्नागिरी पॅसेंजर कळंबणी स्थानकानजीक एक तास थांबवण्यात आली. एक्स्प्रेसमधील प्रवासी एक्स्प्रेसमधून खाली उतरून सुरू होण्याची वाट पाहत होते. प्रवाशांचा खोळंबा झाला. मुंबईतीतील ब्लॉकमुळे आधीच गाड्या उशिराने धावत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 22/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here