मुंबई : विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर शिवसेनेकडून दोन नाव निश्चित करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हेंचे नाव निश्चित करण्यात आले आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
