चिपळूणमध्ये उद्या सर्वपक्षीय सभा

0

चिपळूण : शहरातील माधव सभागृह येथे (भोगाळे) माजी नगरसेवक शिरीष काटकर यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ रोजी सायंकाळी ५ वा. ही सभा होणार आहे.

सध्या राज्याचे वातावरण गढूळ झालेले आहे, आपल्या अस्मितेचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. हे कुठेतरी प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीला खटकत आहे. परंतु, चिपळूण शहरात आजपर्यंत खेळीमेळीचे आणि सर्वांशी संबधित जे वातावरण राहिलेले आहे, ते तसेच रहावे, येथील कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून मर्यादेचे उल्लघंन आजपर्यंत झालेले नाही, ते वातावरण तसेच निकोप राहावे, यासाठी ही सभा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here