दुचाकीस्वारास ट्रॅक्टरची धडक; ट्रॅक्टर चालकाचे पलायन

मंडणगड : शनिवार दि. ०२ मे रोजी देव्हारे कडूक फाटा बोरखत या रस्त्यावर एका ट्रॅक्टरने समोरून येणारे दुचाकीस्वार गोविंद शिवाजी चव्हाण यांना धडक देऊन अपघात केल्याची घटना घडली. यानंतर धडक दिलेला ट्रॅक्टर चालक गाडी घटनास्थळी ठेवून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच बाणकोट सागरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक उत्तम पिठे यांनी अपघाताचे ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्यांच्या पोलिस व्हॅनमधून रुग्णाला तात्काळ ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे नेवून दाखल केले. या अपघाताची माहिती देव्हारे येथील ग्रामस्थ अमर देवळेकर यांनी दिली. त्यांनी दुचाकीस्वाराचे कुटुंबास तात्काळ दिली. दरम्यान, मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात या रुग्णावर प्रथमोपचार करून रुग्णास अधिक उपचाराकरिता मुंबईतील रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी बाणकोट पोलिस अधिक तपास करीत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here