दापोली बसस्थानकातील दुकानाला भीषण आग

जालगाव : दापोली शहरातील बसस्थानकातील दुकानाला शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानातील जवळजवळ सर्व सामान जळून खाक झाले. बसस्थानकातील असणाऱ्या श्री. गाला यांच्या खाद्यपदार्थ दुकानाला शुक्रवारी रात्री साडे अकरा वा.च्या समारास अचानक आग लागली. या घटनेनंतर परिसरात असणाऱ्या नागरिकांनी व बाजारपेठ येथील युवकांनी धाव घेतली तसेच न.पं.चा अग्निशमन बंबही घटनास्थळी दाखल झाला. या बंबाच्या सहाय्याने नागरिकांनी आग विसरण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोड्या वेळाने ही आग पुन्हा भडकली यानंतर पुन्हा पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्यात आली. यावेळी बंबातील पाणी संपल्याने तो मध्यरात्री पुन्हा भरून आणण्यात आला व पुन्हा पाण्याचा मारा करण्यात आला. या आगीमध्ये श्री गाला यांच्या दुकानाचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेदरम्यान एसटी स्टँडवर कोरोना बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिस मित्र, आरोग्य सेवक यांनीही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here