मुंबई : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणूकीचे वारे संपूर्ण राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. यावरून आता भाजप आणि रिपाईमध्ये जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आला. एक जागा रिपाईला देण्यात यावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी भाजप चार जागांवर निवडणूक लढवत आहे. ज्या ४ जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. भाजपला जिंकता येणाऱ्या ४ जागांपैकी १ जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी आज रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मागणी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र्र अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पाठविले आहे.
