मंडणगड : शिक्षणासाठी राजस्थान कोटा येथे असलेले व लॉकडाऊन कालावधीत अडकून पडलेले तालुक्यातील ९ विद्यार्थी शनिवारी स्वगृही परतले. त्यांना येथील आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. तालुक्यातील ९ विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कोटा येथे आहेत. लॉकडाऊनमुळे हे सर्व विद्यार्थी गेले दीड महिना कोटा येथे अडकून पडले होते. केंद्रशासनाने विद्यार्थ्यांना त्यांचे स्वगृही जाण्याची परवानगी दिल्यानंतर तब्बल ४० तासांचा एस.टी. प्रवास करून कोटा येथून १८ विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे. त्यानंतर त्यांना पालकांच्या ताब्यात देऊन होम क्वारंटाईन केलं गेले आहे.
