खेड : तालुक्यातील एका व्यक्तीकडे बेकायदेशीररित्या धान्याचा साठा केल्याची बाब उघड होताच प्रशासनाने तातडीने धाव घेत हा धान्यसाठा सील केला आहे. या ठिकाणी १२५ हून अधिक गव्हाची पोती आढळल्याची बाब पुढे आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठप्प असल्याने सर्वसामान्यांना ३ महिने प्रति माणसी ५ किलो मोफत धान्य देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. काही ठिकाणी धान्याचे वितरण होत असले तरी अनेकांना अजूनही धान्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. अर्ज ऑनलाईन झाले नसल्याचे कारण देत अनेकांना माघारी पाठवले जात आहे. या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीकडे तब्बल ५० किलो वजनाची गव्हाची पोती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासकीय यंत्रणेने हा धान्यसाठा सील केला आहे.
