नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा 42 हजारांवर गेला आहे. देशात एकूण 42 हजार 836 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 29 हजार 453 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासांत देशात 1,074 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंतचा रुग्ण बरे होण्याचा हा सर्वाधिक आकडा आहे. आतापर्यंत देशात 11,707 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. भारतात कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत असताना एक दिलासादायक बाबही समोर येत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या बरे होण्याच्या रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढून तो 27.52 टक्के इतका झाला असल्याची, माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
