बांग्लादेश दौऱ्यात पुन्हा रोहितकडे कर्णधारपद

0

टीम इंडिया आता न्यूझीलंड दौऱ्यावर असून यानंतर लगेचच बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. बांग्लादेशविरुद्ध भारत तीन एकदिवसीय सामने 4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी खेळणार असून त्यानंतर दोन कसोटी सामनेही खेळणार आहे.

दरम्यान एकदिवसीय सामन्यांसाठी बीसीसीआयनं नुकताच संघ जाहीर केला आहे. तसंच या दौऱ्यात टीम इंडिया ए देखील मैदानात उतरणार असून त्यासाठीचा संघही जाहीर झाला आहे. भारतीय एकदिवसीय संघाचं नेतृत्त्व पुन्हा एकदा रोहित शर्माकडे गेलं असून इंडिया ‘ए’ संघाचं नेतृत्त्व अभिमन्यु ईश्वरन करणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत रवींद्र जाडेजा भारतीय संघाचा भाग असणार नाही. दुखापतीमुळे त्याला टीम इंडियातून वगळावे लागले आहे. याशिवाय यश दयाल देखील दुखापतीमुळे भारतीय संघाचा भाग असणार नाही. यांच्या जागी कुलदीप सेन आणि शाहबाज अहमद यांना संघात स्थान दिलं आहे. वन डे संघाचा रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे या संघात शिखर धवनला संधी दिल्याने पुन्हा एकदा रोहित-शिखर जोडी मैदानात दिसणार आहे. तर नेमका संघ कसा आहे, पाहूया…

बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मो. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन

भारत आणि बांग्लादेश एकदिवसीय सामन्याचं वेळापत्रक:

सामनातारीखठिकाण
पहिला एकदिवसीय सामना4 डिसेंबरशेर ए बांग्ला, ढाका
दुसरा एकदिवसीय सामना7 डिसेंबरशेर ए बांग्ला, ढाका
तिसरा एकदिवसीय सामना10 डिसेंबरशेर ए बांग्ला, ढाका

टीम इंडिया ‘ए’ चं वेळापत्रक आणि संघ

भारतीय ‘ए’ संघाचा विचार करता दोन संघ जाहीर करण्यात आले असून दोन चार दिवसीय सामन्यांसाछी हे संघ जाहीर केले आहेत.यातील पहिला सामना 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर आणि दुसरा सामना 6 ते 9 डिसेंबर होणार आहे.

पहिल्या 4 दिवसीय सामन्यासाठी भारताचा ‘ए’ संघ

अभिमन्यू इसवरन (कर्णधार), रोहन कुनुमल, यशस्वी जैस्वाल, यश धुल, सरफराज खान, टिळक वर्मा, उपेंद्र यादव (विकेटकीपर), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतित सेठ

दुसऱ्या 4 दिवसीय सामन्यासाठी भारताचा ‘ए’ संघ

अभिमन्यू इसवरन (कर्णधार), रोहन कुनुमल, यशस्वी जैस्वाल, यश धुल, सरफराज खान, टिळक वर्मा, उपेंद्र यादव (विकेटकीपर), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतिथ सेठ, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव. , केएस भरत (यष्टीरक्षक)

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:49 PM 24/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here