रत्नागिरी : जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, जिल्ह्यातील काही वाड्यांना पाण्याच्या टंचाईची झळ सोसावी लागत आहे. जिल्ह्यातील 35 गावातील 58 वाड्यांना 11 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सुमारे साडेआठ हजार लोकांना टंचाईची झळ बसत आहे. सर्वाधिक टँकर चिपळूण, संगमेश्वर तालुक्यात दिसून येत आहेत. मागील आठवड्यात सुमारे दहा वाड्यांची भर पडली आहे. मे महिन्याच्या अखेरीस त्यात मोठी भर पडणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रयत्न सुरु आहेत. सध्या नऊ तालुक्यांपैकी गुहागर, रत्नागिरी व राजापूर हे तिन तालुके अजूनपर्यंत टँकरमुक्त राहीले आहेत.
