➡️ दापोलीतील महिला कोरोना पॉझिटीव्ह
दापोली : तालुक्यातील माटवण नवानगर येथील एका 65 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सदर महिलेला पोटाचा त्रास होत असल्याने त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबई येथे अधिक उपचारासाठी गेल्या होत्या तेथे त्यांनी सायन रुग्णालय व केईएम रुग्णालय येथे व एका खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. त्यांना तीन दिवसापूर्वी रुग्णवाहिकेतून दापोलीत आणण्यात आले. दापोलीत आणल्यानंतर त्यांचा स्वॅब अधिक तपासणीकरिता पाठवण्यात आला. त्यांचा स्वॅब प्राप्त झाला असता त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात जिल्ह्यात कोरोनाबाधित चार रूग्ण सापडले होते. त्यानंतर आता दापोलीत एक महिला कोरोनाबाधित सापडली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 11 वर पोहचली असून 5 रूग्णांवर उपचार सुरु आहेत.
