देवरुख नगरपंचायत स्वमालकीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये होणार शहर उपजीविका केंद्र

0

देवरुख : देवरुख नगरपंचायत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्थापित प्रेरणा शहर स्तर संघास शहर उपजीविका केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.


हे केंद्र कार्यान्वित करण्यासाठी देवरुख नगरपंचायतने स्वमालकीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सदर उपजीविका केंद्रास जागा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल प्रेरणा शहर स्तर संघाच्या कार्यकारणी समिती सदस्यांनी दि.२१ नोव्हेंबर २०२२ रोजी नगरपंचायत देवरुखच्या पदाधिकारी व मुख्याधिकारी यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमा दरम्यान प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत मंजूर झालेल्या रुपये रु. 12,40,135/- मात्र निधीचे घे भरारी व सावित्रीबाई फुले वस्तीस्तर संघास वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघाच्या अध्यक्षा सौ. मनिषा चव्हाण तसेच संघाच्या सदस्य श्रीम. साक्षी कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी नगरपंचायत देवरुखचे नगराध्यक्षा सौ. मृणाल शेटये व उपनगराध्यक्ष श्री.वैभव कदम यांनी वस्तीस्तर संघास मदत लागेल तेव्हा नगरपंचायत देवरुख सहकार्य करेल असे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमासाठी नगरपंचायत देवरुखचे मुख्याधिकारी श्री. चेतन विसपुते, पाणीपुरवठा सभापती सौ. रेश्मा किर्वे, नगरसेवक श्री प्रफुल्ल भुवड, श्री.यशवंत गोपाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रेरणा शहर स्तर संघाच्या सचिव सौ. श्रुती गोंधळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here