रत्नागिरी : तालुक्यातील आंबेकरवाडी येथील तरुण शीळ धरणामध्ये पाय घसरून बुडाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमाराला घडली. त्यानंतर धरणात बुडालेल्या या तरुणाचा शोध रात्री उशिरापर्यंत घेतला जात होता. हा तरुण लाकडे घेऊन घरी परत येत होता. तरुण बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती महेश म्हाप तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या तरुणाचा शोध लागला नव्हता. राजेश भरत आंबेकर (वय 23, फणसवळे A. D. No. 25/20 ), असे या तरुणाचे नाव असून, आज सकाळी 6:45 ला त्याचा मृतदेह मिळाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:47 AM 05-May-20
