‘चला जाणूया नदीला’ नियोजनासाठी बैठक

0

चिपळूण : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्ह्याची जलसाक्षरता व ‘चला जाणूया नदीला’ या संदर्भातील पुढील आखणी संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांविषयी सखोल चर्चा केली व समन्वयकांनी केलेल्या सूचनांप्रमाणे लवकरात लवकर आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या बैठकीस रत्नागिरी जिल्ह्याच्या न.रे.गा. च्या प्रमुख तळेकर, जलसंधारण विभागाच्या सीईओ वैशाली नारकर, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

या बैठकीस मार्गदर्शक समन्वयक म्हणून जलनायक किशोर धारिया, पांडे तसेच वाशिष्ठी – जगबुडी नदीचे समन्वयक शाहनवाज शाह, बाव नदीचे समन्वयक युयुत्सू आर्ते व अनिल कांबळे यांनी सखोल चर्चा करून अभियानातील संवाद यात्रा तसेच जलसाक्षरतेच्या प्रलंबित प्रश्नांविषयी सूचना केल्या. जिल्हाधिकारी सिंह यांनी अभियानाच्या तयारी संदर्भात सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here