राज्य समितीच्या आवाहनाला महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनकडून प्रस्तावपर प्रतिसाद

➡️ कोणत्याही प्रकारच्या परीक्षा आयोजित केल्या तरी अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार

विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांच्या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना प्रदान केल्यानंतर राज्य समितीने मुंबई विद्यापीठांच्या कुलगुरूमार्फत विद्यार्थी संघटनांकडून त्यांची मते व सूचना मागविण्याचे आवाहन केले होते. त्याद्वारे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनकडून (मासु) दिनांक ०२/०५/२०२० रोजी कोरोना विषाणूंच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यासाठी विद्यापीठांच्या सेमिस्टर/शेवटच्या वर्षाच्या परीक्षांचे निराकरण करण्याबाबत राज्य समितीला मुंबई विद्यापीठांच्या कुलगुरुमार्फत प्रस्ताव पाठविलेला असून तो कुलगुरूंना प्राप्त झाला व राज्य समितीच्या बैठकीत आमच्या प्रस्तावावर विचार केला जाईल, असे आम्हाला सूचित करण्यात आले, असे मासुकडून कळविण्यात आले आहे. तसेच, ‘ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यास आमचा आक्षेप आहे सध्याच्या परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारच्या परीक्षा आयोजित करताना विद्यापीठे आणि विद्यार्थ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. जर परीक्षा घेण्याचा अट्टहास करण्यात येत असेल तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची व भविष्याची जबाबदारी कुणाची याचा खुलासा राज्य समितीने करावा तसेच या परीक्षेच्या दरम्यान एक विद्यार्थ्याला देखील कोविडचा प्रादुर्भाव झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी हि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि विद्यापीठ प्रशासन यांची असेल’, असे परखड मत मासुचे संस्थापक अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे यांनी व्यक्त केले. तर, विद्यार्थ्यांचे परीक्षांबद्दलचे मत काय आहे? हे जाणल्यावर ७५% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा न घेता मागील सेमिस्टर/वर्षाच्या आधारे आम्हाला सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करावे,असे मासुचे राज्य सहसचिव दादाराव नांगरे यांनी निदर्शनास आणले. ‘परीक्षा आयोजनात शिक्षक, विद्यार्थी, परीक्षक आणि इतरांचा मोठ्या सहभाग असतो अशामध्ये कुणाला साधी शिंक तरी आली तरी परिस्थिती गंभीर होऊन भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. जर कोणी कोविड पॉझिटीव्ह असला तर संपर्कात येणाऱ्या व्यक्तीसही लागण होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसात विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनला परीक्षेच्या संदर्भातील प्रश्नांची विचारणा झाली असता त्यातून असे लक्षात आले की, जवळपास ५०% महाविद्यालयांचे ऑनलाइन पद्धतीने क्लासेस झालेले नाहीत आणि जे ऑनलाईन क्लासेस घेतले गेले त्यातून विद्यार्थ्यांना विषय समजताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले’, असे मासुचे कोंकण प्रदेश कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. गौरव शेलार यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून राज्य समितीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी मासुकडून करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:36 AM 05-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here