भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

0

मुंबई : भाजप हा पक्ष आहे की चोरबाजर आहे. त्यांच्या पक्षातील नेते पाहिल्यानंतर बाहेरच्या पक्षातील नेते जास्त असल्याचं दिसतेय. त्यामुळे भाजप हा आयात पक्ष झालाय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.

आपल्याला हुकूमशाही हवी की लोकशाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. काही जण 40 रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. 40 रेडे मी नाही म्हटलं, त्यांचाच मंत्र्यानं म्हटले आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवतिर्थावरच शपथ घेतली. आमची कुलस्वामीनीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आयोध्येला गेलो होतो. हे आज तिकडे गेलेत नवस फेडायला.. गेल्या आठवड्यात गेले होते, स्वत:चा हात दाखवायला. ज्याला स्वत:चं भविष्य माहित नाही, तो आपलं भविष्य ठरवणार.. तुमचं भविष्य जे आहे ते कुरमुडे ज्योतिषाला विचारून जमत नाही… तुमचं भविष्य दिल्लीमध्ये बसणाऱ्यांना विचारा….त्यांनी उठ म्हटलं की उठायचं बस म्हटलं की बसायचं… अन् हिंदुत्व वाचवायला शिवसेना सोडून निघाले, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

बुलढाण्यात आल्यानंतर काही जुने चेहरे दिसत नाहीत.. पण जुने चेहरे फसवे निघाले, गद्दार निघाले. त्यांना असं वाटलं की बुलढाणा त्यांची मालमत्ता आहे.. पण तुम्हाला पाहिल्यानंतर धगधगत्या मशाली असल्यासारखं वाटतेय. आपलं सरकार व्यवस्थित चालेलं होतं. पण यांनी सरकार पाडलं. पण यांची पाडायची पद्धत कशी आहे….

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

दसऱ्याला ठरवलेलं मुंबईबाहेर पहिली सभा बुलढाण्यात घेणार. गद्दारी गाढायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

गद्दारांना बाळासाहेबांचं नाव पाहिजे आणि आशीर्वाद मोदींचा
छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श कसे होऊ शकतात?
महाराजांचा अपमान सहन करणार नाही?
92-93 ला बाबरी पाडली तेव्हा तुम्ही कुठे बिळात लपला होतात, असा टोला भाजपला लगावला.
सुप्रिया सुळेंवर राजकारणात शिवीगाळ कशी करु शकतात? मी असतो तर लाथ मारुन पक्षाबाहेर केले असते?
अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंकडून गटार असा उल्लेख करण्यात आला.
महापुरुषांचा, महिलांचा अपमान तरीही तुम्ही शेपट्या घालून कसं बसता?
आपलं सरकार गेल्यानं शेतकर्यांच नुकसान
खोटं बोलून, रेटून सरकार चालवतात
छत्रपती शिवजी महाराजांची तलवान आणणार अशी घोषणा करणार आणि राज्यपाल अपमान करणार
दिल्लीकरणांना काय वाटतं महाराष्ट्रातील मर्दानगी संपली काय?
वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करावा लागेल

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:56 PM 26/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here