◾ राजापूर हायस्कूलमध्ये उपमुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग
◾ कायदेतज्ञ चंद्रशेखर अभ्यंकर यांचे मार्गदर्शन
◾ संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन
रत्नागिरी : जन शिक्षण संस्थान रत्नागिरी कौशल्य विकास प्रशिक्षणासोबतच जनजागृतीचे विविध उपक्रम राबवीत असते. जिल्ह्यातील ८ तालुक्यांतून आज योजनेचे काम सुरु आहे. या देशातील विद्यार्थी व नागरिकांना संविधानाचे महत्व कळावे व त्यांच्या मनात संविधानाविषयी आदर निर्माण व्हावा तसेच त्यांना आपले मुलभूत हक्क व कर्तव्य यांची जाणीव व्हावी या उद्देशाने हा दिवस जन शिक्षण संस्थान रत्नागिरी मार्फत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून साजरा केला गेला. संविधानाविषयी मार्गदर्शन, भाषण, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन, चर्चासत्र या साऱ्यासह संविधान सन्मान दिवस साजरा झाला.
29 ऑगस्ट 1947 रोजी आंबेडकराच्या नेतृत्वामध्ये संविधानाची निर्मिती करायला एक मसुदा समितीची स्थापणा करण्यात आली होती. अनेक बैठका झाल्या चर्चासत्र घडुन आली. त्यानंतर मसुदा समितीकडुन सादर करण्यात आलेला मसुदा संविधान सभेकडुन 26 नोव्हेंबर 1949 रोजी औपचारीक पदधतीने स्वीकारण्यात आला होता. म्हणुन 26 नोव्हेंबर हा दिवस संपुर्ण भारतात दरवर्षी संविधान दिवस म्हणुन साजरा करण्यात येत असतो.
26 नोव्हेंबर हा पूर्वी कायदा दिन म्हणून साजरा केला जात होता. कारण 1930 मध्ये काँग्रेसच्या लाहोर परिषदेत पूर्ण स्वराज प्रतिज्ञा पारित करण्यात आली होती, या घटनेच्या स्मरणार्थ कायदा दिन साजरा करण्यात येत होता. त्यानंतर, 19 नोव्हेंबर 2015 रोजी, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. संविधानाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
भारतीय संविधान मात्र कायद्यांचे दस्तऐवज नसून संविधान हे भारतीयांनी संतुलित व सक्षम जीवन जगण्यासाठीचे पथदर्शी दस्तऐवज आहे आणि म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम राबविले गेले. यामध्ये राजापूर हायस्कूल, भोगटे टेलरिंग इन्स्टीट्यूट, मैत्री ब्युटी पार्लर, मंडणगड येथील माता रमाई व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, दापोली येथील लॉजिक कॉम्पुटर, निशाज वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टीट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम राबवण्यात आले. जन शिक्षण संस्थेचे कार्यक्रम समन्वयक संतोष घडशी व सहाय्यक कार्यक्रम अधिकार स्वप्नील साखरकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:46 PM 26/Nov/2022
