रत्नागिरी : ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये तीन चाकी रिक्षांना वाहतुकीसाठी परवानगी द्यावी म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते विनायक राऊत यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून विनंती केली. ग्रीन आणि ऑरेंज मधील डोंगरी आणि दुर्गम खेडेगाव भागातील नागरिकांना ये-जा करणे सोयीचे व्हावे यासाठी अटी शर्थीसह रिक्षा वाहतूक सुरु करण्याची विनंती खा. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:54 PM 05-May-20
