संगमेश्वर तालुक्यातील तब्बल ५६ कुळांचे प्रश्न निकाली

0

देवरूख : कोकणात सर्वाधिक कुळांच्या जमिनींचे प्रश्न प्रामुख्याने दिसून येतात. संगमेश्वर तालुक्यातही ७० ‘ब’ चे दावे आहेत. गतवर्षात तब्बल ५६ कुळांची प्रकरणे तहसीलदार संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावण्यात आली आहेत. तालुक्यामध्ये कोंड्ये हे संपूर्ण गाव सातबारा कोरा करण्यासाठी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेत होते. ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने या संपूर्ण गावाचा ७/१२ कोरा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. टप्प्याटप्प्याने या गावातील सातबारा शासकीय सर्व प्रक्रिया पूर्ण करून कोरे करण्यात आले. गेली अनेक वर्षे या गावातील ग्रामस्थ घर बांधून आहेत. मात्र, घराखालची जमीन ही अन्य जमीन मूळ मालकाच्या नावे असल्यामुळे घर असूनही घर ग्रामस्थांच्या नावी होत नव्हते. अखेर शासनाने सातबारा कोरे करण्याचा निर्णय घेऊन जलद गतीने ही प्रकरणे मार्गी लावली. गतवर्षापर्यंत या गावातील प्रकरणे शिल्लक होती. गतवर्षी यातील ५६ प्रकरणे मार्गी लावण्यात आली. यामुळे गावचे २५० सातबारा कोरे झाले आहेत. या संपूर्ण ग्रामस्थांची जमीन सातबारावर नोंदविण्यात आली. यामुळे ग्रामस्थांची मालकी या जमिनीवर सिद्ध झाली.या गावाचा कूळ वहिवाट प्रश्न मार्गी लागला आहे. कुळ जमिनींची विक्री करण्याची प्रकरणेही महसूल विभागाकडून मार्गी लावण्यात आली. जमीन विक्रीची ४० प्रकरणे गतवर्षी पूर्ण करण्यात आली. एकूण बेदखल कुळांची व विक्रीची मिळून ९६ प्रकरणे तहसीलदार संदीप कदम व त्यांचे सहकारी नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागली.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here