लांजात दुचाकीच्या अपघात प्रकरणी एसटी बस चालकावर गुन्हा दाखल

0

लांजा : लांजा आरगाव कुणगेवाडी येथील वळणावर एसटी बसच्या धडकेत दोघेजण जखमी झाल्याची घटना 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वा. च्या सुमारास घडली होती. अपघातात दुचाकीस्वार व एकाच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर वसंत नारकर (43, राजापूर एसटी आगार, मूळ कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस चालक नारकर हा आपल्या ताब्यातील बस घेवून पाचल ते व्हेळ विलवडे मार्गे राजापूरकडे जात होता. यावेळी बस भरधाव वेगाने चालवून व्हेळ बाजूकडून येणार्‍या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत पती पत्नी जखमी झाले. मंगेश सिताराम घाणेकर (36), प्रांजल मंगेश घाणेकर (दोन्ही आरगाव कुणगेवाडी, लांजा) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.

अपघातात दोन वाहनांचे नुकसान झाले. दोघांच्या दुखापतीस वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बस चालक नारकर याच्यावर भादविकलम 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here