बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या रत्नागिरी तालुकाप्रमुखपदी महेश म्हाप यांची निवड

0

पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्या नियुक्त्या

पाली : बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिनिधीच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे उपनेते व राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यात नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नूतन रत्नागिरी
तालुकाप्रमुखपदी महेश उर्फ बाबू म्हाप यांची नियुक्ती केली आहे. तर पाली हातखंबा विभागप्रमुखपदी सचिन तथा तात्या सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हातखंबा उपविभाग प्रमुखपदी
अनिल पाडावे, प्रमोद डांगे यांची नियुक्ती, पाली उपविभाग प्रमुख म्हणून नाणीज सरपंच गौरव संसारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हातखंबा पाली विभागातील या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे पक्षाला संघटना वाढीसाठी आणखी ताकद मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here