दिल्लीत दारूवर 70% ‘विशेष कोरोना शुल्क’

दिल्ली :दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने तळीरामांना चांगलाचं आर्थिक झटका दिला आहे. आजपासून दिल्लीमध्ये दारूवर 70% ‘विशेष कोरोना शुल्क’ लागू केला आहे. मुळे आता 100 रुपयाला मिळणारी दारूची बॉटल आता 170 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे तळीरामांना आपली चैन करण्यासाठी चांगलाचं आर्थिक फटका बसणार आहे. देशात सोमवारपासून तिसरा लॉकडाऊन कालावधी सुरु झाला आहे. मात्र राज्य सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात काही ठिकाणी शिथिलता दिली आहे. तसेच रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तिन्ही झोनमध्ये दारू विकण्यास परवानगी दिली आहे. देशभरातील अनेक दारुची दुकानं उघडली असून तळीरामांनी अगदी प्रथम कर्तव्य मानत दारू खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्या असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ही गर्दी आटोक्यात येण्यासाठीचं केजरीवाल सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here