मारुती मंदिर येथे पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया; दुकानदारांसहित नागरिकांची धावपळ

0

रत्नागिरी : नव्याने झालेल्या नळपाणी योजनेच्या कामातील ढिसाळपणा हळूहळू समोर येऊ लागला आहे. मारुती मंदिर येथील स्टेडियम समोर पाईप लाईन वारंवार फुटत आहे. मंगळवारी दुपारी ही पाइपलाइन फुटली आणि हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाया गेले.

रनपच्या नव्या पाणी योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र दररोज योजनेचे नवे पाईप कुठे ना कुठे फुटून पाण्याची नासाडी होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. शहरातील मारुती मंदिर येथे पाइपलाइन फुटण्याच्या घटना वारंवार होत आहेत
मंगळवारी देखील दुपारी येथील पाईप लाईन पुन्हा फुटली. डांबरी रस्त्या खालून पाण्याचा झोतच बाहेर पडला आणि परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. हजारो लिटर पाणी अवघ्या काही मिनिटात वाया गेले. अचानक पाणी सर्वत्र झाल्याने फेरीवाल्यांची धावपळ उडाली. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गळती लागलेल्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करत गळती लागलेली पाईप लाईन दुरुस्त करत पाण्याची नासाडी रोखली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 30/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here