उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांबाबतचा निर्णय 2 दिवसांत जाहीर करणार

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेतली. बारावी नंतरच्या सीईटी परीक्षा आणि युजीसीच्या परीक्षा या मुख्य विषयावर या बैठकीत विस्ताराने चर्चा झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज्यपालांपुढे मांडण्यात येणार आहे. त्यांच्याशी सल्लामसलत झाल्यानंतर CET सह अन्य परीक्षा केव्हा घ्यायच्या हे विद्यार्थ्यांना दोन दिवसांत कळवण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:23 PM 05-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here