रत्नागिरी : दुकानात होणारी गर्दी, सोन्याचे दागिने हाताळताना वाढणारा धोका आणि त्यामुळे करोना वाढीला लागणारा हातभार, कर्मचारी व ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य देत व सरकारी यंत्रणेवर येणारा ताण अश्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजेच 17 मे पर्यंत सोन्याच्या पेढ्या बंद ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी शहर सराफ असोसिएशनने घेतला आहे. अशी माहिती सराफ-सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खेडेकर यांनी दिली आहे. शिथिलता असल्याने सोन्याची दुकाने चालू ठेवली तर गर्दीची श्यक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या 17 मे पर्यंत म्हणजेच लॉकडाऊन असेपर्यंत सर्व सराफी दुकाने व पेढ्या बंद ठेवण्याचा निर्णय व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या मिटिंगमध्ये आम्ही एकमतांनी घेतल्याचे श्री. खेडेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी रत्नागिरी सराफ असोसिएशनच्या सर्व सभासद यांनी बहुमताने शासनाच्या लॉकडाऊनला समर्थन दिले. त्यामुळे 17 मे पर्यंत रत्नागिरीच्या सुवर्णपेढ्या राहणार बंद राहणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:00 PM 05-May-20
