संगमेश्वर येथे उद्यापासून जन आक्रोश समितीचे उपोषण

0

संगमेश्वर : राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या सुरू असलेल्या कामाविरोधात जनगणूक समितीने १५ नोव्हेंबरला राष्ट्रीय कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना देण्यात आले होते. २८ नोव्हेंबर पर्यंत मागण्या पूर्ण करा अन्यथा संघर्षाला सामोरे जा असा इशारा जन आक्रो समितीने यावेळेस दिला होता, मात्र दिलेल्या निवेदनापैकी मागण्या पूर्ण झाल्याने आता जन आक्रोश समिती आक्रमक झाली असून आजच्या झालेल्या सभेमध्ये 1 डिसेंबर पासून संगमेश्वर या ठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचे समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

आज संगमेश्वर येथे जन आक्रोश समितीची सभा संपन्न झाली या सभेमध्ये संगमेश्वर परिसरातील अनेक संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी या आक्रोशाचे समर्थन करत पाठिंबा दिला आहे. आम्हाला राष्ट्रीय महामार्ग हवा म्हणून आम्ही संयमाची भूमिका आणि मदतीची भूमित भूमिकेतून पुढे येत आहोत मात्र प्रशासनाला आम्हाला त्रासच द्यायचा आहे यामुळे आता आम्ही कंटाळून गेलो असून आम्हाला आता आमचे प्रश्न सोडवून हवेत.त्यासाठी वाट्टेल ते करायला आमची तयारी आहे.

आमची तयारी आहें. कायदा आणि सुव्यवस्थेचा रक्षण व्हावं यासाठी सणदशीर मार्गाने जन आक्रोश समितीने उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. तुझ्या झालेल्या आजच्या सभेसाठी शिवसेनेचे राजेंद्र महाडिक, राष्ट्रवादीचे विवेक शेरे, बाळा शेटे, युयुस्तु आर्ते, वहाब दळवी, परशुराम पवार रमजान गोलंदाज धनाजी भांगे, मैरुंनीसा साखरकर, रफिक साखरकर, दानिश बोट, राम शिंदे, मनोहर गुरव, रिंकू कोळवणकर, विशाल रापटे संगमेश्वर संघटनेचे पदाधिकारी,युवा संघटनेचे पदाधिकारी, नवनिर्मिती फाउंडेशनचे पदाधिकारी, खोके संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी,आदी उपस्थित होते. यावेळी दिलेल्या मागण्या पूर्ण झाल्यास माघार नाही तर न्याय हवा अशी भूमिका समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या उपोषणाच्या वेळेस परिसरातील अनेक सर्वसामान्य लोकांनी यामध्ये सहभागी व्हावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 30/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here