‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सध्या विविध कारणाने चर्चेत आहे. एका टास्कदरम्यान तेजस्विनी लोणारीला दुखापत झाली आहे.
त्यामुळे आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला घर सोडावं लागणार आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य भावूक झाले आहेत. तेजस्विनीला घर सोडावं लागणार असल्याने घरातील सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत. तेजस्विनीच्या हाताला दुखापत झाल्याने तिला घर सोडून जाणे अपिरिहार्य आहे, असं आढळून आलं आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,”तेजस्विनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हे घर आपल्याला आता या क्षणी सोडावे लागेल”. बिग बॉसच्या या बोलण्यानंतर घरात सर्वत्र शांतता पसरली आहे. किरण माने, अपूर्वा, अमृता धोंगडे या सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 30/Nov/2022
