मुंबई : मुंबईतील एका आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. ड्रायव्हरमुळे आयपीएस अधिकाऱ्याला कोरोना झाल्याची माहिती आहे. IPS अधिकाऱ्याचा ड्रायव्हर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र, या अधिकाऱ्यास कोणतीही कोरोनाची लक्षणे नव्हती. पण त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. मुंबईसह राज्यभरात 457 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, दुर्दैवाने राज्यातील 4 पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतील तीन आणि पुण्यातील एका पोलिसाचा समावेश आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:31 PM 05-May-20
