राजापूर : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजन साळवी यांनी राजापूर तालुक्यातील हातीवले चेकपोस्टला भेट दिली. राजापूर तालुक्यातील केळवली जिल्हा परिषद गटातील हातीवले येथील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्दीजवळ असलेल्या पोलिस चेकपोस्टला भेट देऊन हद्दीतून जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची व त्यातील असलेल्या प्रवाशांची कशाप्रकारे तपासणी करण्यात येते, हे जाणून घेतले. हातीवले येथील पोलिस चेकपोस्टला भेट दिल्यानंतर आमदार डॉ. राजन साळवी यांनी तेथे हजर असलेल्या आरोग्य सेवकांशी चर्चा केली. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्याबाबत योग्य सहकार्य मिळेल, याची हमी दिली. तसेच त्यांच्याकडे असलेल्या आरोग्य तपासणी साहित्य याची खात्री करून योग्य त्या सूचना दिल्या.
