रत्नागिरी : अज्ञात कारणातून ऊसरस विक्रेत्याला मारहाण करत त्याच्या सामानाची नासधूस केली. या प्रकरणी ४ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीची ही घटना सोमवार २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास रहाटाघर येथील पेट्रोल पंपाजवळ घडली. या बाबत ऊसरस विक्रेता महम्मद करीम शदाम (३१, मूळ रा. उत्तर प्रदेश सध्या रा. थिबा पॅलेस, रत्नागिरी ) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे रहाटाघर येथे आपला व्यवसाय करत होता. तेव्हा रिक्षा (एमएच ०८-५१५२) मधून आलेल्या ४ अज्ञातांनी त्याला शिवीगाळ करत उसाच्या कांड्यानी हातावर, पाठीवर, डोक्यावर मारहाण केली. तसेच उसाची गाडी पाडून त्यावरील सामानाची नासधूस करत ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 01/Dec/2022