जिल्ह्यातील विंधनविहिरींसह नळपाणी योजना दुरुस्ती कामे मार्गी लागणार

रत्नागिरी : कोरोनामुळे रखडलेली जिल्ह्यातील विंधनविहिरींसह नळपाणी योजना दुरुस्ती कामे मार्गी लावण्यात जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांना यश आले आहे. विंधनविहिरीसाठी संमतीपत्र मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्याने संमतीपत्राऐवजी हमीपत्र घेण्याच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्यामुळे 322 प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. तर पाणी योजना दुरुस्तीच्या 90 प्रस्तावांना मंजूरी मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या विविध कामांबाबत अध्यक्ष बने यांनी आढावा घेतला. त्यात पाणीटंचाई यासह अतिवृष्टीमधील कामांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या टंचाई आराखड्यात नळपाणी योजना दुरुस्तीची 270 कामे घेण्यात आली आहेत. त्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे; परंतु ती कामे लॉकडाऊनमध्ये अडकलेली होती. त्यातील 92 दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्या कामांच्या निविदेचे प्रस्ताव सात दिवसांच्या कमी कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ती कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. अजून पन्नास प्रस्ताव मंजूरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. ही कामे लवकरच मार्गी लागतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:03 PM 05-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here