रत्नागिरी : राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यात काही ठिकाणी वाईन शॉप सुरू झाले असले, तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र मद्यप्रेमीना अजून काही दिवस मद्य दुकाने उघडण्याची वाट पहावी लागणार आहे. कारण वाईन शॉप उघडण्याबाबत प्रशासकीय पातळीवर अद्याप ठाम निर्णय झालेला नाही. केंद्र शासनाने ऑरेंज झोनमधील मद्य दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली, तरी याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकार्यांनी यांना घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मद्य दुकाने उघडण्यास परवानगी देण्यास निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी मद्यप्रेमींकडे कळ सोसून वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:10 PM 05-May-20
