मुंबई : करोना हरवण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवांना सवलत दिली आहे. किरकोळ विक्रेत्यांचाही त्यात समावेश आहे. ‘किरकोळ व्यापारी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. सरकार त्यांना वाऱ्यांवर सोडणार नाही,’ असा शब्द अन्न व नागरी पुरवठा खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. ते रिटेल ट्रेड व्यावसायिकांच्या राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर दानवे यांनी सोमवारी झूम अँपवरून बैठक केली. यावेळी दानवे बोलत होते. यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, ‘वास्तविक लॉकडाऊनच्या काळात हा व्यापारी वर्ग स्वत: मोठी जोखिम पत्करून लोकांना सेवा देत आहे’. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, ‘या व्यापाऱ्यांना किमान सहा महिने व्याजातून सवलत देण्यात यावी.व्यवसायासाठी काढलेल्या विम्याचे हप्ते माफ करण्यात यावेत, किमान या वर्षासाठी व्यवसाय कर माफ करण्यात यावा,’ अशी मागणी दानवे यांनी यावेळी बोलताना केली. दरम्यान, ‘आमचे सरकार सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. आता वेळ कमी आणि प्रश्न जास्त आहेत. त्यातील काही आता तातडीने तर काही कालांतराने सोडवायचे आहेत,’ असं देखील रावसाहेब दानवे म्हणाले.
