मिरजोळे येथील तरुणीची ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

0

रत्नागिरी : काम मिळेल या आशेने व्हॉटस् ॲपवर आलेल्या लिंकवर क्लिक करून तरुणी आपल्या खात्यातील तब्बल ६५ हजार ४२४ रुपये गमावून बसली.

ही घटना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.२४ ते ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २.४० वा. कालावधीत मिरजोळे येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अनिशा स्वामिदत्त रुमडे (रा. मिरजोळे कालिकानगर, रत्नागिरी ) हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानूसार तिच्या व्हॉटस् अॅपवर एका अनोळखी नंबरवरून एक मोल लिंक पाठवण्यात आलेली होती. या लिंकद्वारे फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 02/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here