आवास योजनेसाठी उद्या कार्यशाळा

0

रत्नागिरी : सर्वांसाठी घरे २०२४ या केंद्र शासनाच्या धोरणांतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण आवास योजनांना गतीमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी व राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत महा आवास अभियान २०२२-२३ दिनांक २० नोव्हेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे.

HTML tutorial

या अभियानाच्या अनुषंगाने रत्नागिरी तालुक्याची महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार ०३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० या वेळेत कै. शामराव पेजे सभागृह (तळमजला) जिल्हा परिषद, रत्नागिरीचे आवारात आयोजित करण्यात आली असल्याचे गट विकास अधिकारी, पंचायत समिती, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 02/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here