उद्योगमंत्री उदय सामंत दोन दिवस रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

0

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

HTML tutorial

शुक्रवार 02 डिसेंबर 2022

रोजी पहाटे 05.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जनशताब्दी एक्सप्रेसने चिपळूण, जि. रत्नागिरी कडे प्रयाण.

सकाळी 09.00 वाजता जनशताब्दी एक्सप्रेसने चिपळूण, जि. रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह चिपळुणकडे प्रयाण.

सकाळी 09.30 वाजता शासकीय विश्रामगृह चिपळूण आगमन व राखीव. सकाळी 11.00 वाजता चिपळूण न.प. विकासकामे व शासनाकडे प्रलंबित विषयांबाबत आढावा.(स्थळ : नगर परिषद सभागृह, चिपळूण, जि. रत्नागिरी).

दुपारी 12.00 वाजता चिपळूण शहरातील न.प. अंतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी 01.00 वाजता चिपळूण न.प. अंतर्गत शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन सोहळ्यास उपस्थिती (स्थळ : धवल बँन्क्वेट हॉल, धवल घाग व्यापारी संकुल, दुसरा मजला, चिपळुण, रत्नागिरी). दुपारी 02.00 वाजता पत्रकार परिषद. (स्थळ : धवल बँन्क्वेट हॉल, धवल घाग व्यापारी संकुल, दुसरा मजला, चिपळूण, रत्नागिरी). दुपारी 02.30 ते 03.00 वाजता राखीव.

दुपारी 03.00 वाजता चिपळूण येथून मोटारीने नावडी, ता. संगमेश्वर कडे प्रयाण. दुपारी 03.30 वाजता नावडी (संगमेश्वर) जि.प.गट विकासकामांचा आढावा. (स्थळ : शेट्ये सभागृह, बँक ऑफ इंडियाच्यावर, नावडी).

दुपारी 04.30 वाजता नावडी येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण.

सांयकाळी 05.30 वाजता कुडेवाडी, ता. लांजा येथील धरण भूसंपादनाबाबत आढावा बैठक. (स्थळ: शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.

शनिवार 03 डिसेंबर 2022
रोजी सकाळी 09.00 वाजता कुणबी समाज शिष्टमंडळ समवेत चर्चा. (स्थळ: पाली, ता.जि. रत्नागिरी)

सकाळी 10.00 वाजता महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत “रत्नागिरी ग्रंथोत्सव-२०२२” उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, जयस्तंभ, खारेघाट रोड, रत्नागिरी) सकाळी 11.00 वाजता आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.(स्थळ : स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय आवार, रत्नागिरी)

सकाळी 11.30 वाजता अमृत महाआवास अभियान २०२२-२३ ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा शुभारंभ व लाभार्थ्यांना घरकुल ताबापत्र वितरण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय आवार, रत्नागिरी)

सकाळी 11.45 वाजता स्वच्छ जलसे सुरक्षा अभियान शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.( स्थळ : स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय आवार, रत्नागिरी)

दुपारी 12.00 वाजता रत्नागिरी तालुका टंचाई आराखडा बैठक. (स्थळ : स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय आवार, रत्नागिरी)

दुपारी 02.30 वाजता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम संदर्भात आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) दुपारी 04.00 वाजता अॅड. प्रसाद जड्यार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. (स्थळ : रम्यनगर, जे. के. फाईल्स, इंदुलकर एंटरप्रायजेस समोर, रत्नागिरी). दुपारी 04.30 वाजता संदेश कलगुटकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. (स्थळ : ३०४, ऑर्किड टॉवर, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) सांयकाळी 07.00 वाजता स्वप्निल (तारक) मयेकर, माजी सरपंच, कोतवडे यांच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : स्वप्निल (तारक) मयेकर यांचे निवासस्थान, कोतवडे, रत्नागिरी). सांयकाळी सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्रौ 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानक कडे प्रयाण.रात्रौ 10.50 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 02/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here