दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा जयंती सोहळा आजपासून

0

पुणे : बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ वा दत्त जयंती सोहळा २ ते ६ डिसेंबर दरम्यान स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.

सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम होणार असून स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची पुण्यामध्ये प्रथमच श्री दत्त भक्ती कथा होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रताप परदेशी यांनी दिली.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, श्री मुकुंद भवन ट्रस्ट तसेच श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग यांच्यातर्फे श्री दत्त भक्ती कथा हा कार्यक्रम दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ६ या दरम्यान होईल. याशिवाय सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत सप्तस्वरोत्सवात २ डिसेंबर रोजी प्रसिद्ध गायक अजित कडकडे, ३ रोजी प्रतिभा थोरात, ४ रोजी श्रीधर फडके, ५ तारखेला पोलिसांसाठी गीतों का सफर ही संगीतरजनी आणि ६ रोजी अमेय ठाकूरदेसाई यांचा कार्यक्रम होईल.

ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागीरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अॅड. रजनी उकरंडे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ. पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांनी सोहळ्याचे आयोजन केले आहे. सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 02/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here