रत्नागिरी : शहरातील साळवीस्टॉप येथील डॉ. भोळे हॉस्पिटलनजीक असणाऱ्या इमारतीवरील मोबाईल टॉवरच्या जनरेटरला आग लागल्याने परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मोबाईल टॉवरच्या जनरेटरमध्ये शॉटसर्किट होऊन आग लागली. त्यामुळे धुराच्या लोळासह आगीच्या ज्वाला दिसत होत्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. रत्नागिरी नगर पालिकेला याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अग्नीशमकबंबदाखल झाला. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले.
