पक्ष संघटनेत गटबाजी खपवून घेणार नाही : मनसे अध्यक्ष राज ठाकरे

0

कुडाळ : जिल्हा मनसे संघटनेत गटबाजी खपवुन घेणार नाही. गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना चाळण लावून खड्या सारखे बाजूला केले जाईल, हे लक्षात ठेवा, असा खास ठाकरे शैलीतील इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील मनसे पदाधिकाऱ्यांना दिला.

HTML tutorial

मुंबई स्थित जिल्ह्यातील संपर्क प्रमुखांना जिल्ह्यातील गटबाजीचा परिपूर्ण अहवाल पंधरा दिवसांत सादर करा, असे त्यांनी यावेळी बजावले. गुरुवारी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील हॉटेल लाईम लाईट येथे बंद दाराआड मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अमित ठाकरे, प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख धीरज परब, तालुकाप्रमुख प्रसाद गावडे, उपतालुकाप्रमुख दीपक गावडे, बाबल गावडे, राजेश टंगसाळी आदी उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. बुधवारी कुडाळ येथे ते दाखल झाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 02/Dec/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here