रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.
राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यासंदर्भात खासदार विनायक राऊत म्हणाले, कोकण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. या पूर्वी सुद्धा अनेक मोठमोठी मंडळी येऊन गेलेली आहेत. परंतु, कोकणी माणसाने बाळासाहेबांवर आणि उद्धव साहेबांवर असलेलं प्रेम कायम ठेवले आहे. कोकण दौऱ्यावर येणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वागत आहे. कोकणातील वातावरण खूप चांगलं आहे. त्या वातावरणाचा व कोकणातील जेवणाचा त्यांनी आस्वाद घ्यावा आणि त्यांची तब्येत चांगली कशी होईल, या दृष्टीने त्यांनी पाहावं. त्यांच्या पक्षाला कोकणातील वातावरण अजिबात पोषक ठरणार नाही, असा खोचक टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 02/Dec/2022
