संगमेश्वर : तालुक्यातील बामणोली येथे आलेली महिला कोरोनाबाधित झाल्याची घटना ताजी असताना देवरूखनजीकच्या पूर झेपलेवाडीत मुंबईतून आलेल्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. यानंतर पूर परिसर सील करण्यात आला. गेल्या आठ दिवसामध्ये तालुक्यात ठाणे तसेच मुंबईहून आलेल्या कुटुंबियांमधीलच दोन महिला कोरोनाबाधित झाल्याने तालुका हादरून गेला आहे. तालुक्यातील बामणोलीसह पूर गावात आलेल्या महिलांचा बाधितांमध्ये समावेश झाला आहे. पतीचे निधन झाल्यामुळे ही महिला मुंबईहून पूर येथे दि. २७ एप्रिल रोजी आली होती. यानंतर २८ रोजी ही महिला दोन मुले, दीर व चालक यांना तात्काळ साडवली येथील संस्थात्मक विलगीकृत करण्यात आले. मात्र, या महिलेला तापाची लक्षणे दिसत असल्याने मुलगा व त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर या पाचही जणांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी तिघांचे नमुने निगेटिव्ह आले तर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह तर मुलाचा स्वॅबचा अहवाल येणे बाकी असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून उपलब्ध झाली आहे. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर पूर परिसर सील करण्यात आला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:51 AM 06-May-20
